रचना क्र. 47
सकळ साधनांचे फळ
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
सकळ साधनांचे फळ ।
रामनामचि केवळ ॥धृ॥
जप तप अनुष्ठान ।
अंती नामचि प्रमाण ॥१॥
नाना मंत्र मंत्रावळी ।
सोडवीना अंतकाळी ॥२॥
महापातकी पतित ।
नामे तरले अनंत ॥३॥
नाम साराचेही सार ।
नाम सकळांसी आधार ॥४॥
दास म्हणे सांगू किती ।
नामाविणे नाही गती ॥५॥
