रचना क्र. 68
रामनाम वदो वाणी
कै. यमुनाबाई केतकर
रामनाम वदो वाणी ।
अन्नदान राहो सदनी ॥१॥
वृत्ति राहो समाधान ।
हेचि मज द्यावे दान ॥२॥
अखंड राहो गुरुवास ।
हाचि माझा निदिध्यास ॥३॥
हेचि मागणे गुरु आई ।
दुजे अन्य काही नाही ॥४॥
हाचि मनी धरी नेम ।
गुरुकृपे होईल काम ॥५॥
दीनदासीची विनवणी ।
कधी भेटेल चक्रपाणी ॥६॥
