रचना क्र. 69
असाल तेथे नामाचे चिंतन
श्री सेना महाराज
असाल तेथे नामाचे चिंतन ।
याहुनि साधन आणिक नाही ॥१॥
सोडवील माझा भक्ताचा कैवारी ।
प्रतिज्ञा निर्धारी केली आम्ही ॥२॥
गुणदोष याती न विचारी काही ।
धावे लवलाही भक्तकाजा ॥३॥
अवघे काळी वाचे म्हणा नारायण ।
सेना म्हणे क्षण जाऊ न द्या ॥४॥
