रचना क्र. 25
श्री समर्थ रामदास स्वामींची आरती
श्री पेठेकाका
जय श्री रामदासा समर्था सदया ।
सज्जनगडनिवासा राममय हृदया ॥धृ॥
कल्याणाचे चिंतन बालपणी केले ।
त्याच्या ध्यासे माया प्रपंच त्यागियले ।
घोर तपाने राघव सगुणी प्रगटविले ।
जगदोद्धारासाठी सर्वस्वा दिधले ॥१॥
पिंजुनि काढुनि जागृत देश हा केला ।
स्वधर्म जगण्या अवघा जन प्रेरित केला ।
स्वास्थ्याच्या शिवस्वप्ना आकार दिधला ।
कार्याने वनभुवना आनंद झाला ॥२॥
दासांसाठी बोध अक्षरमय केला ।
आत्मारामी राम शब्दी आणियला ।
हरेक श्लोक मनाचा मंत्र हा झाला ।
दीन भक्तां मार्ग करुणाष्टक दिधला ॥३॥
