रचना क्र. 26
श्री महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जयदेवा, गुरुदेवा ब्रह्मचैतन्या ।
मायबाप आपण आम्हां अनन्यां ॥ जयदेव, जयदेव ॥धृ॥
हरिभक्तीच्या वंशी जन्म साधियला ।
बालवयी अतिकष्टे सद्गुरु शोधियला ॥
साक्षात्कार तयांच्या पूर्णकृपे झाला ।
जानकिजीवन जीवनसांगाती बनला ॥ जयदेव, जयदेव ॥१॥
प्रापंचिक कित्येकां तैशा विरक्तां ।
नाम देउनि दुर्लभ राम दिला हाता ॥
ज्ञानप्रेम देई आजहि तव सत्ता ।
दीनभक्त धन्य सद्गुरुगुण गाता ॥ जयदेव, जयदेव ॥२॥
