रचना क्र. 72
बहु अपराधी जन्मलो पाषाण
श्री आनंदसागर
बहु अपराधी जन्मलो पाषाण ।
मुखी नारायण नाम नाही ॥१॥
नाम नाही मुखी मन नाही स्थिर ।
विषयी तत्पर सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ वृत्ती हिंडती बाजारी ।
आता कैसे हरी आकळावे ॥३॥
कैसी आकळे वृत्ति कैसी जाय भ्रांति ।
कैसी राममूर्ति चित्ती वसे ॥४॥
चित्ती वसे ऐसा घडावा उपाय ।
म्हणुनि सद्गुरुपाय धरियेले ॥५॥
धरियेले पाय ते माझे जीवन ।
अनन्य शरण हरि पायी ॥६॥
