रचना क्र. 73
गुरुकृपा भागीरथी
श्री कृष्णदास महाराज
गुुरुकृपा भागीरथी ।
भेटो आली तुज प्रती ॥१॥
तपा तपाने भेटी होई ।
भेटीमुळे शांती येई ॥२॥
स्वानुभव सरस्वती ।
पुढे होय तुज प्राप्ती ॥३॥
तूचि गंगा तूचि कृष्णा ।
दूर करी भव तृष्णा ॥४॥
मज पाहे कृपा दृष्टी ।
तुझे पदी घाली मिठी ॥५॥
