रचना क्र. 74
तुझे रूप सदोदित
श्री गोंदवलेकर महाराज
तुझे रूप सदोदित ।
भरो माझे हृदयात ॥१॥
डोळियांचे हेचि सुख ।
पाहे राघवाचे मुख ॥२॥
श्रवणाचे ते काम ।
ऐके सदा रामनाम ॥३॥
हाती होवो देवपूजा ।
नमन करू रघुराजा ॥४॥
पायी होवो तीर्थाटन ।
वंदू संतांचे चरण ॥५॥
दीनदासाची ही सेवा ।
घेई घेई रे राघवा ॥६॥
