रचना क्र. 77
मज नाही ताल गळा
श्री गोंदवलेकर महाराज
मज नाही ताल गळा ।
नका करू हो कंटाळा ॥१॥
करा नामाचा गजर ।
भवसिंधु उतरा पार ॥२॥
नाम घ्यावे सर्व काळ ।
पुन्हा नाही ऐशी वेळ ॥३॥
काय आहे गळ्यापाशी ।
नाम घोका अहर्निशी ॥४॥
नका पाहू ताल गळा ।
वाचे राम राम बोला ॥५॥
दीनदासाचे हे बोल ।
तुम्ही मानू नका फोल ॥६॥
