रचना क्र. 78
काय होऊ उतराई
श्री निरंजन रघुनाथ
काय होऊ उतराई ।
तया सद्गुरुच्या पायी ॥१॥
ज्याच्या वचने संसार ।
उठाउठी जाला दूर ॥२॥
देऊ धनसंपत्तीसी ।
तरि ते मिथ्या जड राशी ॥३॥
देह करावा अर्पण ।
तरी तो नाशवंत जाण ॥४॥
निरंजन म्हणे फार ।
करू आता नमस्कार ॥५॥
