रचना क्र. 91
मी माझे विसरुनी जाई
श्री गोंदवलेकर महाराज
मी माझे विसरुनी जाई ।
ऐसे करी माझे आई ॥१॥
मग मी जाईन मरून ।
तुझे पायी स्थिरावीन ॥२॥
तुम्हा जोडू दोन्ही करा ।
एवढे द्यावे रघुवीरा ॥३॥
कृपा करी देवाधिदेवा ।
मज न्यावे तुमचे गावा ॥४॥
मज नको मुक्तिधन ।
माझे हरावे मी पण ॥५॥
दास म्हणे रामराया ।
आता येऊ द्यावी दया ॥६॥
