रचना क्र. 111
गुरु भजनावीण तरेना
श्री कृष्णदास महाराज
भवसागर उतरेना, प्राणी
गुरु भजनावीण तरेना ॥धृ॥
आगम निगम सर्वहि शिकला ।
विद्येमध्ये प्रवीण झाला ॥
परि भवसागर तरेना...प्राणी
सर्व कला त्या अवगत त्याला ।
तीर्थे सर्वहि फिरोनि आला ॥ परि..
वेदान्तीही म्हणति तयाला ।
प्रसंग ओळखी झाली त्याला ॥ परि..
जावे तिकडे वंदिती ज्याला ।
लोकी धन्य धन्य गाईला ।
व्यर्थ होउनि शहाणा ॥१॥
राम कृष्णादि तत्पर गुरु भजनाला ।
तू भजसीना जरी तयाला ॥ व्यर्थ..
अंती कोण रे सोडवि तुजला ।
माय बहिणीचा व्यर्थ गलबला ॥
सोडविता कोणी दिसेना ॥
दादा बापू पाही मढ्याला ।
काळ लावील फांस तुजला ।
सोडविता कोणी दिसेना ॥२॥
