रचना क्र. 116
गेला गेला जन्म वाया
श्री गोंदवलेकर महाराज
गेला गेला जन्म वाया ।
तारी तारी राम राया ॥१॥
नाही घडले संध्यास्नान ।
नाही केले तीर्थाटन ॥२॥
नाही घडली तुझी सेवा ।
ऐसा पातकी मी देवा ॥३॥
नाही घडला संतसंग ।
कामक्रोधी सदा धुंद ॥४॥
दास म्हणे तुम्हा लोका ।
त्याच्या तोंडावरी थुंका ॥५॥
