रचना क्र. 122
निश्चय पूर्ण करा
श्री निरंजन रघुनाथ
निश्चय पूर्ण करा , पूर्ण करा ।
गुरुवचने भव सारा ॥धृ॥
श्रुतिशास्त्राची उक्ति ।
होती गुरुवचनाने मुक्ति ॥१॥
गुरुचरणी मन जडले ।
त्याला सर्वही साधन घडले ॥२॥
गुरुवचनी जो राहतो ।
तो नर नारायण होतो ॥३॥
गुरुपदी निश्चय होता ।
येते निरंजनपद हाता ॥४॥
