रचना क्र. 125
नरदेह वाया जाय, सेवी सद्गुरुचे पाय
श्री तुकोबा
नरदेह वाया जाय ।
सेवी सद्गुरुचे पाय ॥१॥
सांडोनिया अहंभाव ।
धरी भक्ती पूजी देव ॥२॥
थोराचिया वाटे ।
जाता भवशोक आटे ॥३॥
प्रल्हादाते तारी ।
तुका म्हणे तो कंठी धरी ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 125
श्री तुकोबा
नरदेह वाया जाय ।
सेवी सद्गुरुचे पाय ॥१॥
सांडोनिया अहंभाव ।
धरी भक्ती पूजी देव ॥२॥
थोराचिया वाटे ।
जाता भवशोक आटे ॥३॥
प्रल्हादाते तारी ।
तुका म्हणे तो कंठी धरी ॥४॥