रचना क्र. 130
सर्व शब्दांचा घोटाळा
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री)
सर्व शब्दांचा घोटाळा ।
टाकुनि होई रे मोकळा ॥१॥
पापपुण्य शब्दापाशी ।
धर्माधर्माच्या या राशी ॥२॥
बंध मोक्ष शब्दमहिमा ।
शब्दे जीव मिळे ब्रह्मा ॥३॥
गुरुशिष्य शब्दासाठी ।
शब्दजनित विश्वरहाटी ॥४॥
शब्द गिळुनी नाचे दत्त ।
सदा स्मरे अवधूत ॥५॥
