रचना क्र. 131
रहस्य जे जाणती तयांनी
श्री पेठेकाका
रहस्य जे जाणती तयांनी ओळखिले गुरुस ।
धन्य धन्य ते शिष्य
जयांनी ओळखिले गुरुस ॥धृ॥
पूर्णब्रह्म कधि कृपाळूपणे ।
धरिते आकृतिस ॥१॥
अपुल्या परि जरि देह दिसे तरि ।
ईश्वर हा खास ॥२॥
बाह्य वागणे सामान्यांसम ।
देश तसा वेश ॥३॥
मुक्त असोनि सांभाळिति किति ।
बाह्य बंधनास ॥४॥
बद्ध जागविति, आणिक देती ।
गती साधकास ॥५॥
अतर्क्य लीला खेळ मांडिला ।
गूढ देहबुद्धीस ॥६॥
बुद्धिभेद टाळून शिष्यवर ।
जाणति स्वरूपास ॥७॥
गुरुआज्ञा हे एकच साधन ।
पळ न विकल्पास ॥८॥
दीन लीन अति ब्रह्मानंदी ।
अभेद जे गुरुस ॥९॥
