रचना क्र. 135
घर प्रारब्ध सुखे भोगी
श्री गोंदवलेकर महाराज
घर प्रारब्ध सुखे भोगी ।
तोचि जाणा उत्तम योगी ॥१॥
काही वेळ शरीर संपत्ती ।
कधी भरली रक्तपिती ॥२॥
काही वेळा विपुल धन ।
कधी कवडी नाही एक कण ॥३॥
काही काळ आप्त गोत ।
कधी एकलाचि राहात ॥४॥
कधी मिळे मंदिर माडी ।
कधी न मिळे हो झोपडी ॥५॥
काही वेळा दारा पुत्र आज्ञा पाळी ।
कधी देती शिव्यागाळी ॥६॥
कधी मिळे पालखी हत्ती घोडा ।
कधी न मिळे तुटका जोडा ॥७॥
काही वेळा हुकुम सत्ता ।
कधी लोक मारिती लाथा ॥८॥
कधी मिळे मिष्टान्न भोजन ।
कधी न मिळे भाजीपान ॥९॥
दास म्हणे सर्व काळ सारिखा राही ।
तोचि परमार्थी झाला पाही ॥१०॥
