रचना क्र. 137
जागृत आपण हृदयी असता
श्री पेठेकाका
जागृत आपण हृदयी असता मज कसली चिंता ?
माझे हृदयीच्या अवधूता ! ॥धृ॥
रजोगुणाचे विणले जीवन ।
सत्त्वतमाची तयात गुंफण ।
सुखदु:खाचे भोगी मिश्रण ।
त्रिगुणातीता हृदयी धरिता आनंदच ये हाता !
माझे हृदयीच्या अवधूता ! ॥१॥
डोळ्यांवरती ‘मी’ चा सारा ।
तव विस्मृतीची प्रगाढ निद्रा ।
दीन शोधितो सदा निवारा ।
अंतरिचा ‘गुरु’‘दत्त’गवसता शांत किती करि चित्ता !
माझे हृदयीच्या अवधूता ! ॥२॥
