रचना क्र. 141
हरिस्मरणाची, हरिकरुणेची
श्री पेठेकाका
हरिस्मरणाची, हरिकरुणेची, हरिकृपेची, हरिप्रेमाची -
वाकळ मज दिधली, गुरूने वाकळ पांघरली,
मला हो, वाकळ पांघरली ॥धृ॥
हवेपणाची भरे हुडहुडी
नकोपणाची त्यात तातडी
देहबुद्धिने काकडता मी
उपदेशाची घालि घोंगडी, ऊब मला दिधली... ॥१॥
कधी मोह हा डाव साधितो
क्रोधाचाही वणवा जळतो
त्यात पोळता मला पाहुनी
गुरुकृपेचा घनू बरसतो, तगमग ही हरली... ॥२॥
अविवेकाचे झोंबे वारे
चंचल हे मन कुठे न थारे
तळमळ चिंता सदा काळजी
दीन म्हणे गुरु ‘स्मरण’ जागवी, चिंता नच उरली... ॥३॥
