रचना क्र. 140
हरिची भक्ती बरी, भक्ती बरी
श्री निरंजन रघुनाथ
हरिची भक्ती बरी, भक्ती बरी ।
तारक भवसंसारी ॥धृ॥
सर्वांतरी हरि पहावा ।
अंतरी निश्चय भाव धरावा ॥१॥
हरीचे सद्गुण गावे ।
प्रेमळ वचनाने आळवावे ॥२॥
विषयभोग विसरावे ।
निरंजन भक्तीने भजावे ॥३॥
निशिदिनी सत्संगासि धरावे ।
भवजळि रितिने याचि तरावे ॥४॥
