रचना क्र. 146
व्हावे तरी काम होवो तुझिया नामे
श्री पेठेकाका
व्हावे तरी काम होवो तुझिया नामे ।
न व्हावे ते न होवो तुझिया नामे ॥१॥
व्हावा तरी प्रपंच होवो तुझिया नामे ।
न व्हावा तो न होवो तुझिया नामे ॥२॥
तीर्थव्रतनेम होवो तुझिया नामे ।
न व्हावे ते न होवो तुझिया नामे ॥३॥
व्हावे तरी हित होवो तुझिया नामे ।
न व्हावे ते न होवो तुझिया नामे ॥४॥
घेता नाम वाटे घडे ते सुखाचे ।
नाम सत्ते नाचे प्रारब्धही ॥५॥
प्रयत्नांचे आदीअंती तुझे नाम घेऊ ।
दीन म्हणे जाऊ संतमार्गे ॥६॥
