रचना क्र. 153
तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती
श्री तुकोबा
तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती ।
तुजलागी प्रीती चालो सदा ॥१॥
तू माझा जिव्हाळा जीवीचा जिवलग ।
होसी अंतरंग अंतरीचा ॥२॥
गणगोत मित्र तू माझे जीवन ।
अनन्यशरण तुझ्या पायी ॥३॥
तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास ।
आवडे अभ्यास सदा तुझा ॥४॥
