रचना क्र. 157
चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न
श्री स्वामी स्वरूपानंद
चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न ।
कल्पांतीही खिन्न होऊ नये ॥१॥
अंतरी असावा अखंड उल्हास ।
आपत्तीचा त्रास मानू नये ॥२॥
संसारी रहावे अलिप्त उदास ।
मोहे मायापाश जोडू नये ॥३॥
स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास ।
संतांचा सहवास सोडू नये ॥४॥
