रचना क्र. 159
आहे त्याचा भोग, नाही त्याचा त्याग
श्री जयरामनाना महाराज
आहे त्याचा भोग, नाही त्याचा त्याग ।
चिंतेचा प्रसंग, आणू नको ॥१॥
सभेमाजी जैसा , तैसा घरामाजी ।
संतोषाशी राजी , राखी सदा ॥२॥
कधीच उद्योग, विषयी नसावे ।
प्रसंग सोसावे, सर्वत्रांचे ॥३॥
जयराम विठ्ठल, शहाणा होऊ पहासी ।
तरी साधूपाशी, काळ घाली ॥४॥
