रचना क्र. 170
माझी माय दयासिंधु, गुरुमाय दयासिंधु
श्री पेठेकाका
माझी माय दयासिंधु, गुरुमाय दयासिंधु
तरवील भवसिंधु ॥धृ॥
जरी पहा मी ओढित घाणा
वाटे मज सम कुणि न शहाणा
सावध करुनी भूल काढिते, माय दयासिंधु ॥१॥
पाइक अविरत मी चिंतेचा
सदा पहा मी दास ‘उद्या’चा
काळाहातुनि मला सोडवी, माय दयासिंधु ॥२॥
करीन हे मी, करीन ते मी
संसारातुन सुख मिळविन मी
मज दीनाचा भवभ्रम काढी, माय दयासिंधु ॥३॥
