रचना क्र. 173
आहे आहे नाही नाही । संसारस्थिती
श्री पंत महाराज
आहे आहे नाही नाही । संसारस्थिती ।
म्हणुनी वरिली गुरुभक्ती ॥धृ॥
एका क्षणीचे नाही दुजे क्षणी । सर्वही पालटते ।
काही स्थिर न राहाते ॥१॥
स्वप्नवत संसारयात्रा । दिसुनी नासते ।
मूढ जना सत्यचि भासते ॥२॥
त्रयावस्थातीत दत्त । भजकां भेटतो ।
द्वैताद्वैत भाव आटतो ॥३॥
