रचना क्र. 172
आवडीचे संत भेटती ते मज
श्री विश्वनाथ महाराज
आवडीचे संत भेटती ते मज ।
सांगावया गुज तुझे देवा ॥१॥
तेव्हा कळे सुख तुझ्या चरणांचे ।
अनेक जन्मांचे जाई पाप ॥२॥
पाहती लोचन रूप डोळाभरी ।
आत ते बाहेरी ध्यानी तुझ्या ॥३॥
म्हणे विश्वनाथ हाचि लाभ खरा ।
जन्माचा सोयरा देवा तूच ॥४॥
