रचना क्र. 192
तो मज आवडतो
श्री कल्याण स्वामी
तो मज आवडतो ।
मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी ॥धृ॥
अक्षय पदाचा सुखदाता ।
निरसुनि मायाममता ॥१॥
भक्तिमार्गीच्या गजढाला ।
चालविल्या आढाला ॥२॥
काय बोलू मी कीर्तीसी ।
न दिसे तुळणा ज्यासी ॥३॥
छत्र बहुतांचे दासांचे ।
धामचि कल्याणाचे ॥४॥
