रचना क्र. 193
दत्तासी गाईन, दत्तासी पाहीन
श्री माणिकप्रभू
दत्तासी गाईन, दत्तासी पाहीन ।
वाहिले हे मन, रे दत्तापायी ॥धृ॥
दत्त स्वयंरूप, दत्त माय बाप ।
माझे त्रिविध ताप, रे दत्त वारी ॥१॥
दत्त ज्ञानज्योती, दत्त गुरुमूर्ती ।
दत्त हरी भ्रांती, रे माणिकाची ॥२॥
