रचना क्र. 196
देवा, संताचिया पायी ठेवा
श्री पेठेकाका
देवा, संताचिया पायी ठेवा । मजला ॥धृ॥
सुखासाठी कोठे जावे ।
दु:ख कोणासी सांगावे ।
सर्व भावांसी विसावा ।
संत शांत करिती जीवा ॥१॥
जग झिजे स्वार्थासाठी ।
कोणी नसे कोणासाठी ।
संत मात्र करिती सेवा ।
जगासाठी झिजविती जीवा ॥२॥
भेदभावासी ना स्थान ।
बोध, कृपाही समान ।
संत कल्याणाचा ठेवा ।
तेथे घोटाळूदे जीवा ॥३॥
संत घेती सांभाळून ।
प्रेमवर्षाव करून ।
देव सगुण पहावा ।
ऐसे वाटे दीन जीवा ॥४॥
