रचना क्र. 198
नको रे मना पाहू नको नयनी
श्री पेठेकाका
नको रे मना पाहू नको नयनी,
ऐकू नको कानी ! ॥धृ॥
दोष दुज्यांचे उणे जगाचे ।
कशास चिंतन हवे तयांचे ।
नको मलिनता मनी ! ।१॥
कसे म्हणावे चूक कुणाते ।
अपुल्यासम हे जगही चुकते ।
जाणुन राही जनी ! ॥२॥
जगी कुणासम कुणी न असते ।
ज्या त्या ठायी उचितचि जे ते ।
दीना धरि रे मनी ! ॥३॥
