रचना क्र. 211
नाही जया आला संसाराचा वीट
श्री समर्थ रामदास स्वामी
नाही जया आला संसाराचा वीट ।
तया मोक्षवाट सांपडेना ॥१॥
करी बापा आता संसाराची सोडी ।
धरू नको गोडी आश्रमाची॥२॥
केलीयाने होते केले चि पाहिजे ।
जे मनी धरीजे ते चि होते ॥३॥
भक्ति भाव क्रिया मोक्षाचे साधन ।
वीतरागी मन सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ जेथे कथा निरूपण ।
श्रवण मनन निजध्यास ॥५॥
कांता पुत्र धन वैभव स्वजन ।
रामेवीण आन आवडेना ॥६॥
आवडेना भार नाथीला संसार ।
रामदासी सार रामदास्य ॥७॥
