रचना क्र. 212
भावे जोडोनिया हात
श्री पेठेकाका
भावे जोडोनिया हात ।
संतचरणा विनवीत ॥धृ॥
आलो सोडुनीया आप्त ।
स्वार्थदंभाचे गणगोत ।
द्यावी भक्तांची संगत ।
संतचरणा विनवीत ॥१॥
रागलोभ कुळ माझे ।
धैर्ये टाकिले मी ओझे ।
मज देवा घ्या पदरात ।
संतचरणा विनवीत ॥२॥
सुटो नश्वराचा मोह ।
जावो समूळ संदेह ।
जागो देव हृदयात ।
संतचरणा विनवीत ॥३॥
सुखे जाईन माघारी ।
देव घेउनी अंतरी ।
सांभाळा हो दीनभक्त ।
संतचरणा विनवीत ॥४॥
