रचना क्र. 248
रघुविरकृपा बरी संपादीली
श्री निरंजन रघुनाथ
रघुविरकृपा बरी संपादीली ।
तेचि कामा आली, यथाकाळी ॥१॥
दत्तात्रय स्वामी, संकटी पावले ।
दुःख निवारीले, सर्व माझे ॥२॥
धन्य आम्ही झालो, संसारा येऊन ।
आता गाऊ गूण, श्रीगुरूचे ॥३॥
निरंजन म्हणे, अपराध क्षमा ।
करा सर्वोत्तमा, अनाथाचा ॥३॥
