रचना क्र. 251
विश्रांतीचे स्थळ, स्वरूप केवळ
श्री रामदास स्वामी
विश्रांतीचे स्थळ, स्वरूप केवळ ।
द्वैत तळमळ, जेथे नाही ॥१॥
जेथे नाही काया, नाही मोह माया ।
रंका आणि राया, सारिखेची ॥२॥
सारिखेची सदा-सर्वदा स्वरूप ।
तेचि तुझे रूप, जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वये, तूचि आपणासी ।
सोऽहं स्मरणासी, वीसरता ॥४॥
वीसरता सोऽहं, स्मरण आपुले ।
मग गुंडाळले, मायाजाळी ॥५॥
मायाजाळी तूझा, तूचि गुंतलासी ।
यातना भोगीसी, नेणोनिया ॥६॥
म्हणोनिया होई, सावध अंतरी ।
सोऽहं दृढ धरी, दास म्हणे ॥७॥
