रचना क्र. 252
जाणावे आपण, अपुल्याला जाणावे
श्री पेठेकाका
जाणावे आपण, अपुल्याला जाणावे ॥१॥
जग-जीवन जैसे, तैसे मग जाणावे ॥२॥
जे असे, नसे ते, का कैसे जाणावे ॥३॥
जे जीवन व्यापुन, उरते ते जाणावे ॥४॥
जे जाणुन ज़गती, ते पावन जाणावे ॥५॥
त्या जिवां, जीवना, ‘जीवनवेद’ म्हणावे ॥६॥
