रचना क्र. 253
माझे सर्व जावे, देवाने रहावे
श्री रामदास स्वामी
माझे सर्व जावे, देवाने रहावे ।
देवासी पहावे, भक्तपणे ॥१॥
भक्तपणे मज, देवचि जोडला ।
अभ्यास मोडला, सर्व काही ॥२॥
सर्व काही जावो, एक देव राहो ।
माझा मति भावो, ऐसा आहे ॥३॥
जो हेत अंतरी, देव तैसा जाला ।
हा दिन पाहिला, कोणी एक ॥४॥
कोणी एक पुण्य, जे होते संचले ।
दास म्हणे जाले, समाधान ॥५॥
