रचना क्र. 254
हरिवीणे व्यर्थ आचार समर्थ
श्री निवृत्तीनाथ
हरिवीणे व्यर्थ आचार समर्थ ।
हरि हेचि हित अरे जना ॥धृ॥
ते रूप पंढरी पुंडलीकसंगे ।
एका नामे पांग पाश तोडी ॥१॥
सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण ।
वेदमते खूण ऐसी असे ॥२॥
निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद ।
नाही भिन्नभेद विश्वी इये ॥३॥
