रचना क्र. 257
समता वर्तावी अहंता खंडावी
श्री निवृत्तीनाथ
समता वर्तावी अहंता खंडावी ।
तेणेचि पदवी मोक्षमार्ग ॥धृ॥
क्षमा धरी चित्ती अखंड श्रीपति ।
एक तत्त्व चित्ती ध्याईजेसु ॥१॥
नाम हाचि मंत्र नित्य नाम सार ।
दुसरा विचार घेऊ नको ॥२॥
अन्य शास्त्रे भजता नाही पै मुक्तता ।
हरिनाम गाता मुक्ति रोकडी ॥३॥
नित्य सुख घ्यावे नामचि अनुभवावे ।
तरीच सुख पावावे इहीलोकी ॥४॥
निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान ।
एकरूप ध्यान मनि ध्यातु सदा ॥५॥
