रचना क्र. 256
बरवी उघडली दृष्टी
श्री तुकोबा
बरवी उघडली दृष्टी ।
नाहीतरी होतो कष्टी ।
आक्रंदते सृष्टी ।
मात्र या चेष्टांनी ॥धृ॥
लटकियाची आशा ।
होतो पडिलो वळसा ।
होउनिया दोषा ।
पात्र मिथ्या अभिमाने ॥१॥
मरणाची नाही शुद्धी ।
लोभी प्रवर्तली बुद्धी ।
परती तो कधी ।
घडेचिना माघारी ॥२॥
साचूनी मरे धन ।
लावी पोरांसी भांडण ।
नाही नारायण ।
तुका म्हणे स्मरीला ॥३॥
