रचना क्र. 265
न निंदिता कधी अन्न
श्री पेठेकाका
न निंदिता कधी अन्न ।
खाती तेचि भाग्यवान ॥१॥
कोणा द्यावे किती काय ।
ठाउके ते देवा होय ॥२॥
मुंगीचे मनोगत जाणे ।
त्याचे स्मरण राखणे ॥३॥
मौन सहज साधन ।
घडे ज्यासी असे भान ॥४॥
दीन म्हणे यज्ञ घडे ।
ज्याचे हवेनको मोडे ॥५॥
