रचना क्र. 269
आइके हो कांते
श्री निरंजन रघुनाथ
आइके हो कांते, माझे हे उत्तर।
लुटवी संसार सर्वकाही ॥१॥
उत्तम वसने भांडे पात्र धन ।
संग्रह करणे काशा आम्हा ॥२॥
लिहिले प्राक्तनी न चुके सर्वथा ।
मग का हे वृथा, साठवावे ॥३॥
ऐसे बोलूनीया शुद्ध निरंजन ।
दिला लुटवून संसार ॥४॥
