रचना क्र. 330
पाहे प्रसादाची वाट
श्री तुकोबा
पाहे प्रसादाची वाट ।
द्यावे धुवोनीया ताट ॥१॥
शेष घेउनी जाईन ।
तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालो एकसवा ।
तुम्हा आडुनिया देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त ।
करुनि राहिलो निश्चिंत ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 330
श्री तुकोबा
पाहे प्रसादाची वाट ।
द्यावे धुवोनीया ताट ॥१॥
शेष घेउनी जाईन ।
तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालो एकसवा ।
तुम्हा आडुनिया देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त ।
करुनि राहिलो निश्चिंत ॥४॥