रचना क्र. 331
भावापुढे बळ
श्री तुकोबा
भावापुढे बळ ।
नाही कोणाचे सबळ ॥धृ॥
करि देवावरी सत्ता ।
कोण त्याहूनि परता ॥१॥
बैसे तेथे येती ।
न पाचारिता सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे राहे ।
तयाकडे कोण पाहे ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 331
श्री तुकोबा
भावापुढे बळ ।
नाही कोणाचे सबळ ॥धृ॥
करि देवावरी सत्ता ।
कोण त्याहूनि परता ॥१॥
बैसे तेथे येती ।
न पाचारिता सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे राहे ।
तयाकडे कोण पाहे ॥३॥