रचना क्र. 15
कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा
श्री तुकोबा
कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा ।
चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायांचे चिंतन ।
अवसान ते क्षण नाही मध्ये ॥२॥
काय ऐसा पात्र होईन लाभासी ।
कई हृषिकेशी तुष्टतील ॥३॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित ।
घेईन नित्यानित्य प्रेमसुख ॥४॥
