रचना क्र. 16
सर्व सुख माझे राघवाचे पायी
श्री आनंदसागर
सर्व सुख माझे राघवाचे पायी ।
वासना ती नाही दुजी मज ॥१॥
दुजे मज नाही सगुण निर्गुण ।
नामी तनुमन ध्यान लागो ॥२॥
लागो ध्यानवृत्ति रामाचे चरणी ।
कल्पना जाऊनी हरि कल्पो ॥३॥
हरी कल्पिलिया हरि दाही दिशा ।
चार खाणी तैशा हरिरूप ॥४॥
हरिरूप मज वाटे चराचरी ।
ऐसी कृपा करी सद्गुरुनाथा ॥५॥
कृपा करी म्हणुनि धरियेले पाय ।
सोडोनि न जाय हरिबाळ ॥६॥
