रचना क्र. 17
नाव मारुतीचे घ्यावे
श्री रामदास स्वामी
नाव मारुतीचे घ्यावे ।
पुढे पाऊल टाकावे ॥१॥
अवघा मुहूर्त शकून ।
हृदयी मारुतीचे ध्यान ॥२॥
जिकडे तिकडे जाती भक्त ।
पाठी जाय हनुमंत ॥३॥
रामउपासना करी ।
मारुती नांदे त्यांचे घरी ॥४॥
दास म्हणे ऐसे करा ।
सदा मारुती हृदयी धरा ॥५॥
