रचना क्र. 19
आमुचे सज्जन संत साधुजन
श्री रामदास स्वामी
आमुचे सज्जन संत साधुजन ।
होय समाधान तयाचेनि ॥१॥
तयाचेनि संगे पाविजे विश्रांती ।
साधु आदिअंती सारिखाचि ॥२॥
सारिखेचि सदा संत समाधानी ।
म्हणोनिया मनी आवडती ॥३॥
आवडती सदा संत जीवलग ।
सुखरूप संग सज्जनाचा ॥४॥
सज्जनाचा संग पापाते संहारी ।
म्हणोनिया धरी रामदास ॥५॥
