रचना क्र. 456
जळो ते जाणीव
श्री तुकोबा
जळो ते जाणीव, जळो ते शाहाणीव ।
राहो माझा भाव, विठ्ठलपायी ॥धृ॥
जळो तो आचार, जळो तो विचार ।
राहो मन स्थिर, विठ्ठलपायी ॥१॥
जळो हा लौकिक, जळो दंभमान ।
लागो जीवा ध्यान, विठ्ठलाचे ॥२॥
जळो हे शरीर, जळो हा संबंध ।
राहो परमानंद, माझ्या कंठी ॥३॥
तुका म्हणे येथे, अवघेचि होय ।
धरी मना सोय, विठोबाची ॥४॥
